प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत किनारपट्टीवरची मच्छिमार गावं विकसित करण्यासाठी भारत सरकारनं ४० कोटी रुपयाचा निधी जाहीर केला आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या किनारपट्टीवरील वीस गावांचा समावेश आहे, अशी माहिती भाजपच्या मच्छिमार सेलचे जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांनी दिली. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या निवती, रेडी, तोंडवली, हडी- सर्जेकोट या चार गावांचा समावेश आहे, असंही त्यांनी सांगितलं.
Site Admin | July 25, 2024 7:52 PM | Fishing Villages