राज्यातल्या जवळपास ४ हजार अपात्र महिलांनी लाडकी बहीण योजनेतून माघार घेतली असल्याची माहिती महिला आणि बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. गेल्या महिन्यात शंभर – दीडशे अर्ज आले होते. तर उर्वरित या महिन्यात आल्याचं तटकरे म्हणाल्या.
या महिलांना परत केलेले पैसे विविध कल्याणकारी योजनांसाठी वापरले जाणार आहेत. तक्रार प्राप्त झालेल्या लाभार्थ्यांच्या अर्जाची छाननी सुरू आहे. जानेवारी महिन्याचे पैसे लाभार्थ्यांना २६ जानेवारी पूर्वी दिले जातील, असंही त्यांनी सांगितलं.