लातूर जिल्ह्यात अहमदपूर तालुक्यातल्या ढाळेगाव इथं ४ हजाराहून अधिक कोंबडीची पिल्लं काल संध्याकाळी अचानक मृत्युमुखी पडली. पशुसंवर्धन विभागाचं शीघ्र कृती दल ढाळेगावमध्ये दाखल झालं आहे.
मृत पक्ष्यांचे वैद्यकीय नमुने पुण्यात औंधच्या राज्यस्तरीय पशुरोग निदान प्रयोगशाळेत पाठवल्याचं या दलानं सांगितलं. कडाक्याची थंडी आणि पोल्ट्री शेडमधली वीज गेल्यामुळे पक्ष्यांना ऊब मिळाली नाही. तसंच सर्व पक्षी एकत्र आल्यामुळे गुदमरून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.