बांगलादेशात ढाका-अरिचा महामार्गावर सावर इथे आज रुग्णवाहिकेतल्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने चार जण ठार तर १५ जण जखमी झाले. या रुग्णवाहिकेला बसची धडक बसल्याने हा स्फोट झाला आणि दोन्ही वाहनांना आग लागली.
स्थानिक अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या अपघातामुळे महामार्गावरची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.