डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

रायगडमध्ये मुसळधार पावसामुळे आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू

रायगड जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे ५०० घरांची पडझड झाली आहे. मुसळधार पावसामुळे सावित्री, अंबा, कुंडलिका आदी नद्यांना पूर आल्याने आतापर्यंत ३ हजार ३८९ जणांना स्थलांतरित केलं असून शासनाकडून त्यांना सर्व प्रकारची मदत करण्यात येत आहे.

 

कोल्हापुरात पुराचं पाणी ओसरण्यास सुरुवात झाली असून, जनजीवन पुन्हा पूर्ववत होत आहे.

 

सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला, मात्र पूरस्थिती अद्याप कायम आहे.

 

गडचिरोली जिल्ह्यातही पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र, विविध धरणांतून मोठा विसर्ग करण्यात येत असल्याने, जिल्ह्यातल्या १३ मार्गांवरील वाहतूक ठप्प आहे.