सुमारे २८ लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या ४ नक्षलवाद्यांनी आज गडचिरोली पोलीस आणि केंद्रीय राखीव दलापुढे आत्मसमर्पण केलं. यात एक विभागीय समिती सदस्य, एक एरिया समिती सदस्य आणि दोन दलम सदस्यांचा समावेश आहे. अशोक सडमेक आणि त्याची पत्नी वनिता दोहे, तसंच साधू लिंगू मोहंदा आणि त्याची पत्नी मुन्नी पोदिया कोरसा अशी या नक्षलवाद्यांची नावं आहेत. अशोक १९९१ मध्ये अहेरी दलममध्ये सहभागी झाला. सध्या तो विभागीय समिती सदस्य होता. त्याच्यावर ८२ गुन्हे दाखल असून १६ लाख रुपयांचं बक्षीस सरकारनं जाहीर केले होते.
Site Admin | February 3, 2025 8:48 PM | 4 Naxalites surrender
सुमारे २८ लाख रुपयांचं बक्षीस असलेल्या ४ नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण
