क्वालालंपूर इथे सुरू असलेल्या मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या मिश्र दुहेरी प्रकारात भारताच्या ध्रुव कपिला आणि तनिषा कॅस्ट्रो यांनी आज उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्यांनी दक्षिण कोरियाच्या सुंग ह्युन को आणि हे वोन इओम यांचा २१-१३, २१-१४ असा सरळ गेममध्ये पराभव केला. आद्या वरियथ आणि सतीश करुणाकरन या अन्य एका भारतीय जोडीनेही मिश्र दुहेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.
त्यांनी आज भारताच्याच अमृता प्रथमेश आणि अशित सूर्या यांचा २१-१३, २१-१५ असा पराभव केला. दरम्यान, आजच्या अन्य लढतींमध्ये भारताच्या मालिवका बनसोड ही मलेशियाच्या गोह जिन वेई हिच्याशी, आकर्षी कश्यप ही डॅनिश खेळाडू ज्युली जेकोबसेन हिच्याशी तर अनुपमा उपाध्याय ही थायलंडच्या पोर्नपावी चोचुवाँग हिच्याशी लढत देईल.