मुंबईत सीमाशुल्क विभागाने दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये सोन्याची तस्करी करणाऱ्या चौघांना अटक केली असून त्यांच्याकडून तस्करीचं साडेतीन कोटीपेक्षा जास्त किंमतीचंसोनं जप्त केलं आहे.
सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी रात्री संशयावरून एकाला ताब्यात घेतलं आणि त्याची झडती घेतली असता सोन्याची भुकटी असलेली पाकिटं त्याच्याकडे सापडली. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी इतर दोघांनाही अटक केली आणि त्यांच्याकडून सोनं जप्त केलं.