उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक ७३ पदकांची कमाई केली आहे. त्यात १५ सुवर्ण, ३२ रौप्य आणि २६ कास्यपदकांचा समावेश आहे. पदकतालिकेत महाराष्ट्राचं तिसरं स्थान कायम असून पहिल्या स्थानावर कर्नाटक तर दुसऱ्या स्थानावर सेना दलांचा समावेश आहे. तसंच, मणिपूर, मध्य प्रदेश, तामिळनाडू, दिल्ली, हरयाणा आणि पंजाब यांचा पहिल्या दहा संघांत समावेश आहे.