उत्तराखंड इथे सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने आतापर्यंत ३२ पदकांची कमाई केली आहे. यात ७ सुवर्ण, १६ रौप्य आणि ९ कास्य पदकांचा समावेश आहे. सध्या महाराष्ट्र पदक तालिकेत मणिपूर, संरक्षण दल आणि कर्नाटकनंतर चौथ्या स्थानावर आहे. १० मीटर एअर पिस्तुल स्पर्धेत पार्थ माने याने सुवर्ण पदक तर रुद्रांश पाटीलनं रौप्य पदक पटकावलं. सेना दलाच्या अंकुश जाधव याने या स्पर्धेत कास्य पदक पटकावलं. खो-खोमध्ये महाराष्ट्राचा पुरुष संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. जलतरणात प्रतिक्षा डांगी, रिषभ दास, अवंतिका चव्हाण, मिहीर आंब्रे यांनाही पदक मिळाली.
Site Admin | January 31, 2025 8:01 PM | 38th National Games | Maharashtra
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राची ३२ पदकांची कमाई
