उत्तराखंड इथे सुरू असलेल्या ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने आतापर्यंत सर्वाधिक २५ पदकांची कमाई केली आहे. यात ५ सुवर्ण, १२ रौप्य आणि ८ कास्य पदकांचा समावेश आहे. सध्या महाराष्ट्र पदकतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. आज झालेल्या स्पर्धांमध्ये १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात पुरुष गटात महाराष्ट्राच्या पार्थ माने याने सुवर्ण पदक मिळवलं आहे. तर, रौप्य पदकही महाराष्ट्राच्या रुद्रांक्ष पाटील याने मिळवलं आहे. सेना दलाच्या अंकुश जाधव याने या स्पर्धेत कास्य पदक पटकावलं. काल झालेल्या १० मीटर एअर रायफल प्रकाराच्या अंतिम फेरीत महिलांच्या गटात महाराष्ट्राच्या आर्या बोरसे हिने रौप्य पदक पटकावलं.