३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आज सातव्या दिवशी विविध संघांनी आपल्या खेळाचं शानदार प्रदर्शन केलं. सेना दल संघानं २२ तर कर्नाटकानं १९ सुवर्ण पदकं मिळवली आहेत. तर महाराष्ट्र १५ सुवर्णासह तिसऱ्या स्थानावर आहे. मात्र २६ रौप्य आणि २० कांस्य पदकं जिंकून महाराष्ट्रानं सर्वाधिक ६१ पदकं जिंकली आहेत.
मणिपूर ११ सुवर्ण पदकांसह चौथ्या तर मध्यप्रदेश १० सुवर्ण पदकांसह पाचव्या स्थानावर आहे. तामिळनाडू आणि दिल्लीनंही स्पर्धेत चांगल्या खेळाचं प्रदर्शन केलं आहे. तामिळनाडूने ९ तर दिल्लीने ७ सुवर्ण पदकं जिंकली आहेत. याशिवाय, हरियाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेशाचे संघ देखील पदकतालिकेत पहिल्या दहा संघामधे आहेत. यजमान उत्तराखंडच्या खात्यात आतापर्यंत केवळ एक सुवर्ण पदक पडलं आहे.