डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

January 30, 2025 7:37 PM | 38th National Games

printer

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये १२ पदकांसह महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर

उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या पदकतालिकेत २३ पदकांसह महाराष्ट्राने तिसरा क्रमांक पटकावला आहे. महाराष्ट्राच्या खात्यात ४ सुवर्ण, ११ रौप्य आणि ८ कास्य पदकांचा समावेश आहे. 

 

या स्पर्धेत ट्रायथलॉन प्रकारात महाराष्ट्राने सहा पदकांची कमाई केली आहे. वैयक्तिक ट्रायथलॉन, मिश्र रिले आणि डुएथलॉन अशा तिन्ही प्रकारात महाराष्ट्राने २ सुवर्ण, २ रौप्य आणि २ कांस्य पदकांची कमाई केली आहे. पार्थ मिरगे, डॉली पाटील, मानसी मोहिते या खेळाडूंनी पदकांची कमाई करत महाराष्ट्राच्या पदकांच्या कमाईत भर टाकली आहे. महिलांच्या ४०० मीटर पोहण्याच्या स्पर्धेत मेडले प्रकारात महाराष्ट्राच्या सानवी देशवाल हिने सुवर्णपदक पटकावलं आहे. 

 

या स्पर्धांमध्ये पंधराशे मीटर पोहण्याच्या स्पर्धेत फ्रीस्टाईल प्रकारात दिल्लीच्या कुशाग्र रावत याने १५ मिनिटं, ३७ सेकंद आणि ७९ मिनिसेकंद इतकी वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावलं आहे. कुशाग्रने नोंदवलेली वेळ हा पुरुषांच्या फ्रीस्टाईल प्रकारातला राष्ट्रीय विक्रम ठरली आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा