३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची मशाल ‘तेजस्विनी’ आज उत्तराखंडमधील बागेश्वर इथं पोहोचली. तिथले जिल्हा क्रीडा अधिकारी आणि क्रीडाप्रेमींनी या मशालीचं स्वागत केलं. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांना या महिन्याच्या अखेरीला सुरुवात होईल. उत्तराखंडमध्ये पहिल्यांदाच या स्पर्धेचे आयोजन केलं गेलं आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी मागच्या महिन्याच्या २६ तारखेला हल्द्वानी इथे, क्रीडा स्पर्धेच्या मशाल रॅलीला हिरवा झेंडा दाखवला होता. ही मशाल राज्यातल्या १३ जिल्ह्यांमधल्या ९९ ठिकाणांना भेट दिल्यानंतर २५ जानेवारीला डेहराडून इथं पोहचणार आहे.
Site Admin | January 4, 2025 7:27 PM | 38th National Games
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची मशाल ‘तेजस्विनी’ उत्तराखंड बागेश्वर इथं पोहोचली
