३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या बोधचिन्हासह शुभंकर, मशाल आणि जर्सीचं काल डेहराडून इथं अनावरण करण्यात आलं. केंद्रिय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडीय या समारंभात दूरदृश्य प्रणाली द्वारे सहभागी झाले होते. देशाला जागतिक क्रीडा क्षेत्रात अव्वलस्थानी नेण्याचं पंतप्रधानांचं स्वप्न आहे. त्यानुसार सरकार सतत क्रीडा धोरणांमध्ये सुधारणा करत आहे असं मांडवीय यावेळी म्हणाले.
पुढच्या वर्षी २८ जानेवारी ते १४ फेब्रुवारी दरम्यान उत्तरांडमध्ये या स्पर्धा होणार आहेत.