कोळसा मंत्रालयानं कोळसा वितरण व्यवस्थापन योजनेंतर्गत 38 प्राथमिक रेल्वे प्रकल्पांना प्राधान्य देण्याचं निश्चित केलं आहे. रेल्वे मंत्रालयाच्या समन्वयानं हे प्रकल्प जलदगतीने पूर्ण केले जातील. रेल्वेची दळणवळण व्यवस्था सुधारण, कोळसा पुरवठा वेळेवर होईल या दृष्टिनं प्रयत्न करणे, वितरण व्यवस्थापनावरचा खर्च कमी करणे आणि देशांतर्गत कोळसा वाहतुकीची एकूण कार्यक्षमता वाढवणे हे या प्रकल्पाचं प्राथमिक उद्दीष्ट आहे. सरकारनं या प्रकल्पांपैकी, ओडिशातील दोन महत्त्वपूर्ण रेल्वे प्रकल्पांना नुकतीच मंजुरी दिली आहे. सरदेगा-भालुमुडा दुहेरी मार्ग प्रकल्पामुळे महानदी कोळसा खाण आणि अनेक खाजगी खाणींमधला कोळसा वितरण वाहतूक सुलभ होईल. तसंच बारगड रोड-नवापारा रोड प्रकल्पामुळे तालचेर कोळसा खाणीमधल्या कोळशाच्या वाहतूक वितरण व्यवस्था सक्षम होण्यास मदत होईल.
Site Admin | August 30, 2024 11:09 AM | कोळसा मंत्रालय | कोळसा वितरण व्यवस्थापन योजना