त्रिपुरा सरकारनं काल आगरतळा इथं समारोप झालेल्या दोन दिवसीय डेस्टिनेशन त्रिपुरा बिझनेस कॉन्क्लेव्हमध्ये शिक्षण, आरोग्यसेवा, कृषी आणि आयटी क्षेत्रातील 87 खाजगी गुंतवणूकदारांसोबत 3700 कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले आहेत.
त्रिपुराचे मुख्यमंत्री डॉक्टर माणिक साहा, उद्योग मंत्री संताना चकमा आणि वरिष्ठ राज्य सरकार आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत, खाजगी क्षेत्रातील गोदरेज ऍग्रोव्हेट लिमिटेड, क्रेन ग्लोबल सोल्युशन्स, GNRC हेल्थकेअर इत्यादी कंपन्याबरोबर सामंजस्य करार केले.