डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

नाशिक जिल्ह्यात भरते 365 दिवसांची शाळा

भविष्यातील उत्तम नागरिक घडविण्याच्या उद्देशाने शिक्षक सतत कार्यरत असतात. असेच एक शिक्षक आहेत केशव चंदर गावीत. गावीत यांच्या मेहनतीने नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात दुर्गम भागात असलेली एक शाळा वर्षाचे 365 दिवस सुरू असते. याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.या शाळेत मुलं एकही दिवस सुटी न घेता ते ही सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत आवडीने शिक्षण घेतात. इतकेच नव्हे तर बालवाडी आणि पहिलीच्या मुलांचे 1 ते 70 पर्यंत पाढे पाठ आहेत. तर मोठ्या वर्गातील मुलांचे 1100 पर्यंतचे पाढे पाठ आहेत. या मुलांचा अभ्यास इतका पक्का आहे की, त्यांना राज्य घटनेतील सर्व कलमे पाठ आहेत. मोठी मुले छोट्या मुलांच्या वर्गांवर देखील शिकवतात. इतकेच नव्हेतर दोन हातांनी दोन वेगवेगळ्या विषयांवर लिखाण करू शकतात. सोबत मुलांना वेल्डींग, शिवणकाम, गवंडी काम, शेतीकामही शिकवले जाते. ही मुलं स्वत: शेती करतात. भाजीपाला पिकवून त्याचाच आहारही करतात.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा