डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

July 26, 2024 1:23 PM

printer

श्रीलंकेच्या ३६ विद्यार्थ्यांची भारतात हिंदी शिकण्यासाठी निवड

श्रीलंकेच्या ३६ विद्यार्थ्यांची भारतात हिंदी शिकण्यासाठी निवड करण्यात आली आहे. भारत सरकारकडून दिल्या जाणाऱ्या या शिष्यवृत्तीमध्ये शैक्षणिक शुल्क आणि इतर आवश्यक गोष्टींचा समावेश आहे. हा अभ्यासक्रम नऊ महिन्यांचा असून येत्या ऑगस्टपासून आग्र्यातल्या केंद्रीय हिंदी संस्थेत सुरू होणार आहे. श्रीलंकेतील भारताचे उच्चायुक्त संतोष झा यांनी या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

 

तसंच भारतातल्या वास्तव्यासाठी शुभेच्छा दिल्या. दोन्ही देशातले सांस्कृतिक, भाषिक, साहित्यिक आणि धार्मिक संबंध दृढ करण्यासाठी हिंदी भाषा आणि साहित्याची भूमिका त्यांनी अधोरेखित केली. गेल्या १३ वर्षात श्रीलंकेतल्या १७० विद्यार्थ्यांना ‘परदेशात हिंदीचा प्रचार’ या शिष्यवृत्तीनं सन्मानित करण्यात आले आहे. या वर्षी श्रीलंकेतून सर्वाधिक विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.

a

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा