गेल्या दशकभरात देशात रोजगाराच्या प्रमाणात 36 टक्के एवढी लक्षणीय वाढ झाली आहे. 2014 ते 2024 या कालावधीत 17 कोटी अतिरिक्त रोजगारांची निर्मिती झाल्याची माहिती कामगार आणि रोजगार मंत्रालयानं दिली आहे. गेल्या वर्षी देशात चार कोटी 60 लाख रोजगार निर्माण झाल्याचंही मंत्रालयानं म्हटलं आहे. या दशकभरात कृषी क्षेत्रातल्या रोजगाराच्या संधींमध्ये 19 टक्क्यांनी, उत्पादन क्षेत्रात 15 टक्के तर सेवा क्षेत्रात 36 टक्क्यांनी वाढ झाल्याचं या आकडेवारीतून दिसून आलं आहे. 2017-18 ते 2023-24 या कालावधीत बेरोजगारीचा दर 6 टक्क्यांवरून कमी होऊन सुमारे सव्वा तीन टक्क्यांवर आला. पदवीधर तरुणांची रोजगारक्षमता 2013 मधल्या सुमारे 34 टक्क्यांवरून 2024मध्ये सुमारे 55 टक्क्यांवर पोहोचली. 18 ते 28 वर्ष वयोगटातल्या 4 कोटी 70 लाखांपेक्षा जास्त तरुणांनी ईपीएफओ, अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत आपली नोंदणी केल्याचं मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे.