उत्तराखंडमधल्या अल्मोडा जिल्ह्यात आज एक बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात ३६ जणांचा मृत्यू झाला तर १९ जण जखमी झाले आहेत. या बसमध्ये ५५ प्रवासी होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या अपघाताविषयी तीव्र शोक व्यक्त केला आहे. अपघातातल्या मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री साहाय्यता निधीतून प्रत्येकी २ लाख रुपये तर जखमींना ५० हजार रुपयांचं अर्थसाहाय्य मिळणार आहे. मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी ४ लाख तर जखमींना १ लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणाही धामी यांनी केली आहे.
Site Admin | November 4, 2024 8:17 PM | Uttarakhand
उत्तराखंडमधे बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात ३६ जणांचा मृत्यू, १९ जखमी
