देशातल्या विविध उच्च न्यायालयांमध्ये न्यायाधीशांची ३५९ पदं रिक्त असल्याची माहिती कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात दिली. देशभरातल्या जिल्हा आणि कनिष्ठ न्यायालयांमधेही न्यायाधीशांची ५ हजार २३८ पदं रिक्त असून ही पदं भरण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं.
राज्यसभेत आज कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या कामकाजावर चर्चा झाली. 2022 साला पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आश्वासन पूर्ण करण्यामध्ये सरकार अपयशी ठरल्याची टीका, काँग्रेसचे रणदीप सिंग सुरजेवाला यांनी केली. तर सरकारनं शेतकऱ्यांच्या हितासाठी स्वामिनाथन समितीचा अहवाल लागू केल्याचं भाजपचे सुरेंद्र सिंह नागर यांनी चर्चेत सहभागी होताना सांगितलं.