आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची ३५२वी बैठक जीनिव्हा इथं होत आहे. केंद्रसरकारच्या कामगार आणि रोजगार विभागाच्या सचिव सुमिता दावरा त्यात भारताचं प्रतिनिधित्व करीत आहेत. गरीबी आणि बेरोजगारीच्या निराकरणासाठी केंद्रसरकार राबवत असलेल्या विविध योजनांची माहिती त्यांनी बैठकीत दिली.
गेल्या ९ वर्षांत देशातली २४ कोटी ८० लाख लोकसंख्या गरीबीतून बाहेर आली असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री जनधनयोजना, जीवनज्योती योजना, पीएम सुरक्षा विमा योजना यांचा उल्लेख त्यांनी केला.