वाशिम जिल्ह्यात पावसानं सरासरी ओलांडली असली तरी वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पामध्ये मात्र पाण्याचा साठा वाढलेला नाही. या प्रकल्पात केवळ पस्तीस टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले तरी या प्रकल्पातला जलसाठा वाढला नसल्याने वाशिमकरांमध्ये चिंता पसरली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना पाणी जपून वापरावं अशा सूचना पालिकेनं दिल्या आहेत.
Site Admin | August 2, 2024 5:52 PM | Rain | Washim
वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पात ३५ टक्के पाणीसाठा उपलब्ध
