अफ्रिकेत यावर्षीच्या सुरुवातीपासून मंकीपॉक्स या आजाराचे 32 हजार 400 रुग्ण आढळून आल्याची माहिती अफ्रिकेतील रोगनियंत्रण आणि प्रतिबंध विभागाच्या अफ्रिका केंद्रानं काल दिली. यामध्ये 6 हजार चारशेपेक्षा अधिक रुग्णांना लागण झाल्याची खात्री झाली असून 840 नागरिकांचा मंकापॉक्सनं मृत्यू झाला आहे अशी माहिती या विभागानं दिली आहे. अनेक देशांमध्ये या आजाराचा फैलाव झाल्याच्या पार्श्वभूमीवरव काल दुरस्थ पध्दतीनं आढावा घेण्यात आला. त्यावेळी अफ्रिकेचे आरोग्य विभागातील डिरेक्टर जनरल जीन कसेया यांनी ही माहिती दिली.
गेल्या आठवड्यात 2 हजार 910 नवीन रुग्णांची नोंद झाली असून 436 नागरिक लागण झाल्याची खात्री झाली असून 16 जणांचा मृत्यू झाला आहे. अशी माहितीही त्यांनी दिली. आफ्रिकेतील मंकी पॉक्सची प्रकरणे संपूर्ण अफ्रिकन देशांमध्ये सातत्याने वाढ नोंदवली जाच आहे. या खंडाच्या प्रतिसादाचे प्रयत्न कमी पडत आहे. या भागात रुग्णांचा शोध घेणं, संपर्कात येणाऱ्यांना शोधणं, लागण झालेल्यांवर योग्य उपचार यावर मर्यादा असल्याचं कसेया यांनी यावेळी सांगितलं. आफ्रिका आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, संसर्गानं प्रभावित देशांमध्ये चार टक्क्यांहून कमी रुग्णांवर उपचार आणि इतर सुविधा पोहोचत आहे. अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.