मंगळवारी आणि बुधवारी लेबननमध्ये झालेल्या स्फोटात किमान ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. बैरुत आणि इतर ठिकाणी पेजर आणि वॉकी-टॉकीमध्ये हे स्फोट झाले. हिजबुल्ला ही उपकरणं वापरत होती. परवा पेजरच्या स्फोटात १२ जणांचा मृत्यू आणि सुमारे ३ हजार जण जखमी झाले होते. या स्फोटातल्या मृतांवर अंत्यसंस्काराच्या ठिकाणी काल वॉकी टॉकीच्या स्फोटात २० जण ठार झाले आणि साडे चारशे जण जखमी झाले होते.
पेजरची निर्मिती केलेल्या तैवानी आणि हंगेरीच्या कंपनीने यात कुठलाही सहभाग नसल्याचं स्पष्ट केलंय. या हल्ल्यामागे इस्राइलचा हात असल्याचा आरोप जॉर्डनचे परराष्ट्र मंत्री आयमान सफदी यांनी केला आहे. नव्या प्रकारचे युद्ध सुरू झाल्याचा दावा इस्राइलचे संरक्षण मंत्री योव गालंट यांनी केला.