मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षानं राज्यातल्या हजारो रुग्णांचे प्राण वाचवले असून या योजने अंतर्गत गेल्या २ वर्षं १ महिन्याच्या काळात रुग्णांना ३०१ कोटी रुपये अर्थसहाय्य वितरित करण्यात आल्याचं मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या मुंबईतल्या कार्यालयातून आतापर्यंत २७४ कोटींपेक्षा जास्त, तर नागपूर कार्यालयातून २७ कोटी रुपयांचं अर्थसहाय्य देण्यात आलं. या माध्यमातून राज्यातल्या ३६ हजार १८२ गंभीर आजारी रुग्णांचे प्राण वाचल्याचं यात म्हटलं आहे.
या योजनेची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असून, दुर्धर आजारानं पीडित रुग्णांनी त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुखांनी केलं आहे.