कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजीमध्ये महाप्रसादामधून ३०० जणांना विषबाधा झाली आहे. इचलकरंजीतल्या शिवनाकवाडी गावात यात्रेनिमित्त महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. या महाप्रसादातून सुमारे ३०० ते साडे तीनशे जणांना विषबाधा झाली आहे. या सर्वांवर जिल्ह्यातल्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असल्याचं आमच्या वार्ताहराने कळवलं आहे.
Site Admin | February 5, 2025 3:46 PM | कोल्हापूर | महाप्रसाद | विषबाधा
महाप्रसादामधून ३०० जणांना विषबाधा
