सक्तवसुली संचालनालयाने कर्नाटकातल्या मैसुरू शहर विकास प्राधिकरण प्रकरणी ३०० कोटी रुपये किमतीच्या १४२ स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत. प्राधिकरणाने केलेल्या जमीन वाटपात भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपांच्या तपासाचा भाग म्हणून ईडीने ही कारवाई केली आहे. मैसुरू शहर विकास प्राधिकरणानं १४ जमिनी सिद्धरामय्या यांच्या पत्नी बी. एम. पार्वती यांच्या नावे केल्याचा आरोप आहे.
प्राधिकरणाने या १४ जमिनींखेरीज अन्य काही जमिनी रिअल इस्टेट व्यावसायिकांना भरपाई म्हणून बेकायदेशीररित्या वाटल्या होत्या. त्या जमिनी विकून या व्यावसायिकांनी बेहिशेबी पैसा जमा केला, असा आरोपही ईडीने केला आहे. त्यामुळे पीएमएलए कायद्यांतर्गत ही जप्तीची कारवाई केल्याचं ईडीने म्हटलं आहे.