डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

पावसामुळे राज्यात गेल्या चोवीस तासात ३ जणांचा मृत्यू

 पावसामुळे झालेल्या विविध घटनांमध्ये राज्यात गेल्या चोवीस तासात ३ जण मरण पावले असून ६ जण जखमी झाले आहेत. राज्यातल्या विविध धरणात ८८ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी या कालावधीत हे प्रमाण सुमारे ७१ टक्के होतं. 

 

मुंबईच्या अनेक भागांत आज सकाळी जोरदार पाऊस झाला. मुंबई आणि लगतच्या जिल्ह्यांसाठी आज ऑरेंज अलर्ट लागू असून विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. आज सकाळपर्यंत संपलेल्या चोवीस तासात मुंबईत ४३ मिलीमीटर तर उपनगरात ७३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सखल भागात पाणी साचलं होतं.  

 

हवामान विभागानं आज उत्तर महाराष्ट्र, पालघर आणि रायगडला ऑरेंज अलर्ट दिला आहे. याठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागातही आज जोरदार पाऊस होऊ शकतो, असं हवामान विभागानं कळवलं आहे. 

 

नवी मुंबई परिसरात आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे.  यात काल नेरूळ मध्ये एक  जुनं घर कोसळून तीन घरांचं नुकसान झालं  

 

संततधार पावसामुळे नाशिक मधल्या धरणांमधला पाणीसाठा वाढला असून गंगापूर धरणासह १३ धरणांमधून पुन्हा पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. या पावसामुळे ग्रामीण भागात घरांची पडझड झाली आहे. 

 

लातूरमध्ये मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडलेल्या पावसामुळे मांजरा धरण हे १०० टक्के भरलं आहे. सध्या धरणातून मांजरा नदीपात्रात ३ हजार ४९४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर लातूर-धाराशिव सीमेवरच्या  तेरणा नदीपात्रातला विसर्ग कमी करण्यात आला असून सध्या २ हजार २९० क्यूसेक इतका सुरू आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा