जॉर्डन आणि गाझा सीमेवर झालेल्या गोळीबारात तीन इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती इस्रायल संरक्षण दलानं दिली आहे. हल्लेखोर जॉर्डनचा रहिवासी असून सीमेवर ऍलनबी पूल ओलांडताना त्यानं एका ट्रकमधून येऊन गोळीबार केला. त्यानंतर संरक्षण दलाच्या जवानांच्या प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात हल्लेखोर मारला गेला. तो घेऊन आलेल्या ट्रकची तपासणी केल्याचं इस्रायल संरक्षण दलानं सांगितलं. या घटनेचा तपास करत असल्याचं जॉर्डन सरकारनं म्हटलं आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर सीमेवरला रस्ता दोन्ही बाजूंनी बंद करण्यात आला आहे.
Site Admin | September 9, 2024 3:26 PM | Israelis | Jordan
जॉर्डन आणि गाझा सीमेवर झालेल्या गोळीबारात तीन इस्रायली नागरिकांचा मृत्यू
