दुसरी भारत-सिंगापूर गोलमेज परिषद आज सिंगापूर इथं झाली. भविष्यात दोन्ही देशात सहकार्य वाढवण्याबाबत दोन्ही देशांंच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली. डिजिटायझेशन, कौशल्य विकास, शाश्वत विकास, आरोग्य आणि औषधी या क्षेत्रांबद्दल यावेळी चर्चा करण्यात आली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर, माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, आणि वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल या परिषदेला उपस्थित होते.
भारत आणि सिंगापूर यांच्या राजनैतिक संबंधाच्या ६० व्या वर्धापनदिनानिमित्त जागतिक स्तरावर सहकार्य करण्याबाबत दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली. त्याआधी भारतीय मंत्र्यांनी सिंगापूरचे राष्ट्रपती थर्मन षण्मुगरत्नम आणि प्रधानमंत्री लॉरेन्स वॉन्ग यांची भेट घेतली.