दक्षिण कोरियात प्रवासी विमानाला झालेल्या अपघातात १७९ जणांचा मृत्यू
दक्षिण कोरियात आज सकाळी प्रवासी विमानाला झालेल्या अपघातात १७९ जणांचा मृत्यू झाला. त्यात १७५ प्रवासी आणि ४ विमान कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. फक्त दोन कर्मचारी वाचले आहेत.
बँकॉकहून निघालेलं हे विमान मुआन इथल्या विमानतळावर उतरताना लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाल्यामुळे भिंतीवर कोसळलं आणि त्याला आग लागल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. या दुर्घटनेनंतर, मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावरची सर्व उड्डाणं रद्द करण्यात आल्याचं कोरियाच्या विमानतळ प्राधिकरणानं सांगितलं.
दक्षिण कोरियाचे काळजीवाहू अध्यक्ष चोई सांग-मोक यांनी येत्या ४ जानेवारीपर्यंत राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.
दक्षिण कोरियातले भारतातले राजदूत अमित कुमार यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं असून, अशा कठीण काळात भारतीय दूतावास दक्षिण कोरियातली जनता आणि सरकारसोबत खंबीरपणे उभे असल्याचं म्हटलं आहे.
Site Admin | December 29, 2024 7:48 PM | Plane Crash | south corea