संघटित पद्धतीने केलेल्या सायबर गुन्ह्यासंदर्भात सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण संस्थेने छापेमारी केली आहे. या कारवाईत देशभरातल्या २६ आरोपींना विविध शहरांतून अटक झाली आहे. यापैकी १० जणांना पुणे, ५ आरोपींना हैदराबाद तर ११ आरोपींना विशाखापट्टणममधून अटक झाली आहे. या प्रकरणी बेकायदेशीर पद्धतीने सुरू असलेल्या कॉल सेंटर्सचीही चौकशी सुरू असून आरोपींकडून विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणं, मोबाईल, लॅपटॉप, आर्थिक तपशील यांच्यासह ९५१ वस्तू तसंच ५८ लाख ४५ हजार रुपये रोख रक्कम आणि तीन वाहनं जप्त करण्यात आली आहेत. सिस्टीम हॅक करणे, बँक खात्याचे तपशील विचारून आर्थिक फसवणूक करणे अशा प्रकारच्या तक्रारी त्यांच्यावर नोंद आहेत.
Site Admin | September 30, 2024 1:20 PM | CBI