डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

January 28, 2025 1:53 PM | 26/11 Terror Attack

printer

२६/११ दहशतवादी हल्ल्याचा आरोपी तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा आरोपी तहव्वूर राणा याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे, मात्र त्याच्या प्रत्यार्पणाची तारीख अद्याप स्पष्ट झालेली नाही. २००८च्या नोव्हेंबर महिन्यात मुंबईवर हा दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यातल्या सहभागामुळे दोषी ठरल्यानंतर त्याच्या प्रत्यार्पणाला विरोध करणारी याचिका त्याने दाखल केली होती. मात्र, गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने त्याची याचिका फेटाळल्यानंतर अमेरिकेचा परराष्ट्र व्यवहार विभाग त्याच्या प्रत्यार्पणासाठी पुढची प्रक्रिया सुरू करणार असून लवकरच त्याचं प्रत्यार्पण केलं जाण्याची शक्यता आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा