इस्रायलने गाझापट्टीतल्या एका शाळेवर काल केलेल्या हल्ल्यात २५ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला. या इमारतीत हजारो स्थलांतरितांनी आश्रय घेतला होता, असं हमासच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितलं.
या हल्ल्यात किती नागरिकांचा मृत्यू झाला याची माहिती घेत आहोत, असं इस्रायलच्या लष्कराने म्हटलं आहे. हा हवाई हल्ला हमास बंडखोरांसाठी करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.