छत्तीसगडच्या रायपूर इथं सुरू असलेल्या २४व्या वनवासी क्रीडा स्पर्धेचा आज समारोप झाला. २८ डिसेंबरपासून सुरू झालेल्या या क्रीडा स्पर्धेत देशाच्या २९ राज्य तसंच नेपाळमधून एकूण ५७९ आदिवासी खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेत प्रामुख्यानं फूटबॉल आणि तीरंदाजीचे सामने झाले. फूटबॉलच्या अंतीम सामन्यात टायब्रेकर होऊन संथाल परगाना संघानं केरळला ४-१ नं पराभूत करत जेतेपद पटकावलं. फूटबॉलमध्ये केरळनं दुसरं तर झारखंडनं तिसरं स्थान मिळवलं.
Site Admin | December 31, 2024 8:27 PM | 24th Vanvasi Sports Tournament