पाकिस्तानात बलुचिस्तानमधे क्वेट्टा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात २४ जणांचा मृत्यु झाला तर ४०हून अधिक जण जखमी झाले. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. घटनास्थळी पोलीस, बचाव पथक आणि बॉम्बशोधक पथक दाखल झालं असून मदतकार्य सुरु आहे. जाफर एक्स्प्रेस स्थानकातून निघत असताना हा स्फोट झाला. स्फोटाच्या वेळी स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी होती. या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला जात असून अद्याप कोणत्याही संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. गेल्या काही दिवसात पाकिस्तानच्या या भागात वारंवार बॉम्बस्फोट झाले आहेत.
Site Admin | November 9, 2024 2:14 PM | क्वेट्टा रेल्वे स्थानक | पाकिस्तान | बलुचिस्तान | बॉम्बस्फोट