इस्लामाबादमध्ये झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत ८ मुद्द्यांवर सर्व देशांमध्ये सहमती झाली. ही बैठक अतिशय फलदायी ठरल्याचं परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे. एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य, डिजिटल सर्वसमावेशन, मिशन लाइफ आणि संयुक्त राष्ट्रांची शाश्वत विकासाठी उद्दिष्ट साध्य करण्याच्या मुद्द्यांवर या देशांमध्ये सहमती झाली. SCO Startup Forum, स्टार्ट अप आणि पारंपारिक औषधांसाठी विशेष कार्यगट स्थापन करण्यावरही या देशांमध्ये सहमती झाली.
Site Admin | October 16, 2024 8:41 PM
शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत ८ मुद्द्यांवर सर्व देशांमध्ये सहमती
