23व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं बारामती इथं आयोजन करण्यात आलं आहे. आजपासून 19 जानेवारीपर्यंत होणाऱ्या या स्पर्धेचं उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तर पारितोषिक वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. ऑलिम्पिकपटू दिवंगत खाशाबा जाधव यांचा जन्मदिन ‘राज्य क्रीडा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. याचं औचित्य साधून क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेनं या स्पर्धेचं आयोजन केलं आहे.
Site Admin | January 15, 2025 11:08 AM | State Level Kabaddi Tournament