महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने उमेदवार आणि निवडणूक यंत्रणा कार्यरत झाले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात सुपा टोलनाक्यावर एका गाडीतून २३ कोटी ७१ लाख रुपये किमतीची सोन्याची बिस्किटं आणि चांदी जप्त केली.
निवडणूक आयोगाचं पथक आणि पोलिसांनी या गाडीच्या संशयित हालचाली टिपून हटकलं आणि झडती घेतली तेव्हा हा मुद्देमाल मिळाला. ही गाडी छत्रपती संभाजीनगर कडून पुण्याकडे निघाली असल्याचं चालकानं सांगितलं. याप्रकरणी पुढचा तपास चालू आहे.