छत्तीसगडमधल्या सुकमा जिल्ह्यात आज २२ नक्षलवाद्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि केंद्रीय सुरक्षा राखीव दलासमोर आत्मसमर्पण केलं. यात नऊ महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. सुकमाच्या बडेसेट्टी पंचायतमध्ये अनेक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले असून पंचायत पूर्णपणे नक्षलमुक्त झाली असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात सामील होण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. राज्य सरकारच्या पुनर्वसन धोरणानुसार या सर्व नक्षलवाद्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन निधी दिला जाणार आहे.