उत्तरप्रदेशातल्या प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यानं जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. जगभरातल्या दहा देशांचे २१ प्रतिनिधी उद्या त्रिवेणी संगमात पवित्र स्नान करणार आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या आमंत्रणावरून हे प्रतिनिधी आज भारतात पोहोचले. अरैल इथं सर्व प्रतिनिधींची राहण्याची सोय करण्यात आली आहे. उद्या स्नान केल्यानंतर ते महाकुंभ मेळ्यात जातील. फिजी, फिनलँड, गयाना, मलेशिया, मॉरिशस, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, त्रिनिदाद आणि टोबॅको तसंच संयुक्त अरब अमिराती या देशातून हे प्रतिनिधी आले आहेत.