येत्या २० नोव्हेम्बरला गोव्यामध्ये सुरु होत असलेल्या ५५ व्या इफ्फी, म्हणजेच भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आयोजित फिल्म बझार मध्ये वैविध्याने समृद्ध असलेले २०८ चित्रपट प्रदर्शित केले जातील. यावेळी पूर्ण झालेले अथवा निर्मिती नंतरच्या टप्प्यातले चित्रपट प्रदर्शित केले जातील.
या व्यासपीठावर चित्रपट निर्माते जागतिक चित्रपट प्रोग्रामर, वितरक, विक्री एजंट आणि गुंतवणूकदारांशी थेट जोडले जातील. फिल्म बझार मध्ये प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांमध्ये १४५ फीचर फिल्म्स, २३ मध्यम लांबीच्या आणि ३० शॉर्ट फिल्म्सचा समावेश आहे. NFDC, अर्थात भारतीय राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाची निर्मिती आणि सह -निर्मिती असलेले १२ चित्रपट देखील यावेळी प्रदर्शित केले जातील.