स्पेनमधे मुसळधार पावसानं आलेल्या पुरात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या 205 झाली आहे. स्थानिक हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार, पूरपरिस्थिती बिकट होण्याची शक्यता आहे. पुरात बेपत्ता झालेल्या लोकांचा स्पेनमधे मुसळधार पावसानं आलेल्या पुरात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या २०५ वर पोहोचली आहे. पुरात बेपत्ता झालेल्यांचा शोध अद्यापही सुरु आहे.
ही पूरस्थिती आणखी बिकट होऊ शकते असा इशारा तिथल्या हवामान विभागानं दिला आहे. स्पेनचा नैऋत्य भाग विशेषतः हुलवा प्रांत, तसंच स्पेनच्या पूर्वेकडील भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.दरम्यान या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर स्पेनमध्ये तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला असून, तिथल्या सरकारी इमारतींवचे राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवले आहेत.