दर महिन्याच्या जागतिक सरासरी तापमानात मोठी वाढ दिसून येण्याचा कालावधी लांबल्यामुळे २०२४ हे आतापर्यंतचं सर्वाधिक उष्ण वर्ष ठरण्याची शक्यता आहे. कॉप २९ परिषदेत जागतिक हवामान संस्थेनं सादर केलेल्या अहवालात हे नमूद केलं असून पॅरीस करारातली उद्दीष्टं धोक्यात असल्याचं म्हटलं आहे. या उद्दीष्टानुसार जागतिक सरासरी तापमानवाढ २ अंश सेल्सिअसपेक्षा कमी राखणं अपेक्षित आहे आणि ही वाढ दीड अंशापेक्षा कमी राखण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत राहण्याचा निर्धार पॅरीस करारात करण्यात आला होता. मात्र गेल्या सहा महिन्यातल्या आकडेवारीनुसार ही सरासरी १ पूर्णांक ५४ शतांश असल्याचं आढळून आलं आहे. तापमानवाढीतला प्रत्येक अंश महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे हवामानातले टोकाचे बदल, त्याचे परिणाम, धोका यात वाढ होऊ शकते असं जागतिक हवामान संस्थेचे सरचिटणीस सेलेस्टे साउलो यांनी म्हटलं आहे.
Site Admin | November 13, 2024 9:34 AM | उष्ण वर्ष | २०२४