प्रशासनाच्या कामकाजात सुटसुटीतपणा आणण्यासाठी तसंच ते जास्तीत जास्त लोकाभिमुख करण्यासाठी कालबाह्य झालेले सुमारे दोन हजार नियम काढून टाकण्यात आल्याची माहिती कार्मिक, नागरिक तक्रार आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी दिली आहे. सुशासन दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित एका कार्यक्रमात ते काल नवी दिल्लीत बोलत होते.