बांगलादेशात सुरू असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आयोजित बंद दरम्यान नाशिकमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी सहा गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणात आज २० जणांना अटक करण्यात आली तर उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. आज परिस्थिती नियंत्रणात असून हिंसाचारासाठी जबाबदार असणाऱ्या व्यक्तींविरोधात शासन कडक कारवाई करेल, अशी माहिती पालकमंत्री दादा भुसे यांनी आज वार्ताहर परिषदेत दिली. या घटनेत पाच पोलीस अधिकारी आणि ९ कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी ठिकठिकाणचं सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आलं असून तपास सुरू केला आहे, असंही मंत्री भुसे यांनी सांगितलं.
नाशिकमध्ये काल उसळलेल्या हिंसाचारानंतर आज मात्र जनजीवन पूर्वपदावर आलं आहे.