जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेवरून घुसखोरी करण्याचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला. नौशेराच्या लाम परिसरात काही संशयास्पद हालचाली नजरेस आल्यावर भारतीय लष्करानं काल रात्री ऑपरेशन कांची ही शोधमोहीम सुरु केली. संबंधित परिसरात पूर्णपणे उजेड करुन देखरेख वाढवली. या मोहिमेदरम्यान लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर प्रत्युत्तरात लष्कराने केलेल्या गोळीबारात किमान २ दहशतवादी ठार झाल्याचा अंदाज आहे. शोधमोहीम अद्याप सुरु असून त्यात मोठा शस्त्रसाठा मिळाल्याचं सेनादल सूत्रांनी सांगितलं.
Site Admin | September 9, 2024 2:52 PM | J&K | terrorists
जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराने केलेल्या गोळीबारात किमान २ दहशतवादी ठार
