भारताच्या घाऊक मूल्य निर्देशांकांवर आधारित चलनवाढ मे महिन्यात २ पूर्णांक ६१ शतांश टक्के वाढल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीत म्हटलं आहे. गेल्या पंधरा महिन्यातली ही सर्वाधिक चलनवाढ आहे. नैसर्गिक वायू, कच्चे तेल, खनिज तेल, अन्नपदार्थ यांच्या किमती वाढल्यामुळे ही चलनवाढ झालेली असेल, असं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने म्हटलं आहे. मे महिन्यात अन्नपदार्थांच्या किमती ७ पूर्णांक ४ दशांश टक्के तर भाजीपाल्याच्या किमती ३२ पूर्णांक ४२ शतांश टक्के इतक्या वाढल्या आहेत.
Site Admin | June 14, 2024 8:25 PM | घाऊक मूल्य निर्देशांक | वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय